पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची आढावा बैठक संपन्न

पोलीस मित्र

यावल (जिल्हा क्राइम रिपोर्टर अशोक तायडे) । युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सूर्यवंशी यांच्या आदेशाने जळगाव जिल्हा अध्यक्ष करतार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मांडवा दिगर येथे सर्व पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम आज माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली

युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत कार्यरत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने मांडवा दिगर तालुका भुसावळ येथे एक महत्त्वपूर्ण सर्व पदाधिकारी आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली. सदर बैठक जिल्हाध्यक्ष श्री करतार राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पोलीस मित्र उपक्रम, ग्राहक संरक्षण, पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण तसेच माहिती अधिकाराबाबत जनजागृती या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला. आगामी काळात संघटना अधिक प्रभावी पणे बळकट करण्यासाठी नियोजन, संघटन बळकटीकरण, युवकांचा सहभाग वाढवणे आणि सामान्य नागरिकांपर्यंत हक्क व अधिकारांची माहिती पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात यावा असे मार्गदर्शन श्री अशोक महाराज जामनेर तालुका अध्यक्ष यांनी केले
यावेळी युवा क्रांती फाउंडेशनच्या वतीने उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन व संबोधन करण्यात आले. संघटनेचे उद्दिष्ट, सामाजिक जबाबदारी, पारदर्शक कार्यपद्धती आणि एकजुटीने कार्य करण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष करतार राठोड साहेब यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येयधोरणे आत्मसात करून निःस्वार्थ भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.
बैठकीत विविध तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील समस्या, सूचना व अनुभव मांडले. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन योग्य मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग व संघटनेप्रती असलेली निष्ठा या बैठकीत प्रकर्षाने दिसून आली.
एकूणच, मांडवा दिगर येथे पार पडलेली ही आढावा बैठक पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या पुढील कार्यासाठी दिशादर्शक ठरली असून संघटना अधिक सक्षम, संघटित व प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भालेराव सर यांनी केले तर आभार अशोक तायडे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here