नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – पनवेल परिसरात चिकन विक्रीच्या धंद्याच्या आड सायकल चोरी करणार्या एका टोळीच्या मुसक्या पनवेल शहर पोलिसांनी आवळल्या आहेत व त्यांच्याकडून 22 सायकली हस्तगत केल्या आहेत. त्याचप्रमाणे जनावरे चोरुन त्याची कत्तल करणार्या एका सराईत गुन्हेगाराला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.

पनवेल शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून सायकल चोरीस जाण्याचे प्रमाणे वाढले होते. त्याचप्रमाणे मुक्या जनावरांची चोरी करून त्यांची कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी सुद्धा पनवेल शहर पोलीस ठाण्यात आल्या होत्या. या संदर्भात पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ . जय जाधव , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ 2 , शिवराज पाटिल , सहा पोलीस आयुक्त रविंद्र गिड्डे यांनी रस्त्यावर पडणार गुन्हे किरकोळ स्वरुपाचे असले तरी त्यामधुन सर्वसामान्य जनतेला उपद्रव नुकसान होत असते ( विशेष करून जनावर चोरीचे गुन्हे ) असे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सुचना पनवेल शहर पोलिसांना दिल्या होत्या.

त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त करुन सायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींना निष्पन्न करुन त्यापैकी खालील पाच आरोपीना गु.र.न. 351 / 2020 , भादवि कलम 37 9 , 34 . मध्ये अटक केली आहे. त्यामध्ये हारून अखारअली सहा, वय 32 वर्षे, जुबेर रफायत अहमद , वय 21 वर्षे, जिब्रेल बिरपत अली , वय 20 वर्षे, सलीम साबीर सहा , वय 27 वर्षे, गोविंद रस्वाल वारोही, वय 27 वर्षे सर्व राहणार मुं , पो.कोल्हीकोपर यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील तपास अधिकारी पोउपनिरी सुनिल तारमळे यांनी गुर.न, 351/2020 , भादवि कलम 37 9 . 34 . 2 ) गुरन . 450/2020 , भादवि कलम 37 9 , 401 , 34 . 3 ) गुर न . 346/2020 , भादवि कलम 37 9 .401,34 . 4 ) गुरन , 456/2020 , भादवि कलम 37 9 , 405.34 . हस्तगत माल : 65,000 / -रूपये किमतीच्या वरील गुन्हयातील 4 व इतर 18 अशा वेग वेगळया कपनीच्या एकूण 22 सायकली उघडकीस आणले आहेत. तसेच जनावरे चोरुन त्यांची कत्तल करुन जनावरांचे मांस विक्री करणार्या सराईत गुन्हेगारांना अटक गुन्हयाची उकल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी गोपनीय बातमीदारा व तांत्रीक तपासाव्दारे जनावर चोरीच्या आरोपींना निष्पन्न करुन गजिन । 263/2020 भादवि कालम 37 9 , 401,413,4 साह . महाराष्ट्र पशु सर्वधन कायद कलम 5 9 गुन्हयात अटक करण्यात आली आहे. यामध्ये अटक आरोपींची नावे नुर मोहम्मद इसार कच्छी , वय -25 वर्षे , धदा – बेकार रा . कच्छी मोहल्ला अलमरवा बिल्डीग , रूम नं . 07 ता.पनवेल, बब्बु उर्फ हनीफ युसुफ कुरेशी वय 38 वर्षे धंदा – गाई , म्हशी , बैल यांचे मांसविकी रा . रूम नं 1412 , बी विंग, स्टार टॉवर , लल्लुभाई कपाउड , मानखुर्द , मुंबई सदर आरोपींना दिनाक 10/12/2020 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळली आहे . या गुन्ह्याचा तपास सपोनि अमोल शिंदे यांनी केला असून त्यांनी आतापर्यंत गु.रजि.नं । 263/2020 भादवि कलम 37 9 , 401,413.34 सह . महाराष्ट्र पशु संर्वधन कायदा कलम 5.9 प्रमाणे, गुरजिन ! 317/2020 , भादवि कलम 379 , 42 9..34 सह महाराष्ट्र पशु सर्वधन कायदा कलम 5 अ प्रमाणे उघडकीस आणले आहेत.
सदरची कारवाई अजयकुमार लाडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, संजय जोशी पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखली गुन्हे प्रकटिकरण पथकातील सहा पो निरी अमोल शिदे , पोउपनि सुनिल तारमळे , पो हवा विजय आयरे, पो.ना / परेश म्हात्रे , पोशि / विवेक पारासुर , पोशि युवराज राउत , पोना विनोद पाटील , पोना जी डी चौधरी , पोना भगवान साळुखे , पोशि खेडकर व पोना पवार यांनी केली आहे.







