मुंबई (विशेष प्रतिनिधी) – भक्तीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती हीच खरी सेवा आहे आणि सर्वाना एकत्र घेऊन नवीन भारत घडविण्यासाठी गरज असल्याचे प्रतिपादन खासदार पूनम महाजन यांनी केले. श्रीमती महाजन या चांदीवली येथील काजूपाडा विभागात श्री साई बाबा मंदिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.

श्री साई बाबा मंदिराच्या उदघाटन प्रसंगी खासदार पूनमताई महाजन सोबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, नगरसेवक सुषम सावंत, नगरसेवक प्रकाश देवजी मोरे, नगरसेवक हरिष भांदिंर्गे, नितेश सिंह, ट्रस्टचे अध्यक्ष लॅरिन्स बाबा डिसोझा उपस्थित होते. खासदार पूनम महाजन यांनी चांदीवली आणि महाजन कुटुंबियांच्या आठवणींना उजाळा दिला. साई बाबा सर्वांचे असून भक्तीच्या माध्यमातून समाजातील वाईट प्रवृत्ती कश्या नष्ट होतील, यावर जोर दिला.

सतत 40 वर्षे मुंबई ते शिर्डी पायी पालखी ॐ साई शरण श्री लॉरेंन्स बाबा सेवा ट्रस्ट तर्फे काढली जाते. यावेळी रोझी फ्रांसिस डिसोझा, नेन्सी डिसोझा, एड संजय सिंह, सुनील जैन, किशोर ढमाळ, एड कैलास आगवणे, मेलविन डिसोझा, रत्नाकर शेट्टी, सुभाष गायकवाड, बंशीलाल सिंह, अजीज खान, राम साहू, दिलीप कुडाळकर, संदीप सिंह, शैलेश सिंह, फरीद खान, दीपक बारिया, जगदीप अरोरा, शिवाजी लोंढे, मिलिंद पुजारी, श्याम थापा, आनंद आचरेकर, हिरा पंजाबी, बाबू नाईक, प्रदीप सिंह, नितीन कोरगावकर, अशोक तिवारी, पवन पाठक, प्रकाश चौधरी, ॲड वीरेंद्र दुबे, सवजी पटेल, नंदू साळुंखे, दिपू सिंह, वेंकट शिंदे आणि सर्व साई भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







