राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत खार प्रतिबंधक बंधारा सक्षमीकरणाच्या कामाचे लवकरच भूमिपूजन   

bhumipujan

अलिबाग – सोगावकर –  राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण करण्याचे कामासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजुरी मिळाली आहे.

 

खारभूमी विकास मंडळ ठाणे, जलसंपदा विभागाकडून ही कामे करण्यात येणार आहेत. पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली-पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण करण्याच्या कामास पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंत्रालय स्तरावर संचालक, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग आणि संबंधित विभाग प्रमुखांच्या बैठका घेतल्या होत्या.

 

त्यानुसार शासनाने पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या कामास अनुक्रमे रु. 44 कोटी 40 लाख 37 हजार 689 व रु. 10 कोटी 82 लाख 20 हजार 626 रक्कमेस सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पेण व अलिबाग तालुक्यातील दोन्ही खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या सक्षमीकरणाच्या कामांबाबतचे कार्यारंभ आदेश दिले असून लवकरच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सदरील खार प्रतिबंधक बंधाऱ्याच्या सक्षमीकरणामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here