सिगारेट उधार न दिल्याच्या कारणावरून पानटपरी चालकाची हत्या

murder
संग्रहित छायाचित्र

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – केवळ एका सिगारेटसाठी दोन नशेबाजांनी पानटपरी चालकाची हत्या केल्याची घटना वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात घडली. मुदस्सिर खान असे मृत पानबिडी विक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

 

 

वांद्रे पूर्वेकडील नौपाडा परिसरात मुदस्सिर खान याची पानटपरी आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर आणि शाहू हे दोघे तरुण या ठिकाणी आले. नशेसाठी चोरी, पाकिटमारी करणाऱ्या या दोघांनी मुदस्सिर याच्याकडे उधारीवर सिगारेट मागितली. आधीची उधारी असल्याने आणि सकाळची वेळ असल्यामुळे मुदस्सिर याने सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोघांनी चाकूने मुदस्सिर याच्यावर वार केले.

 

 

नशेत असल्याने दोघे इतक्या जोरजोरात चाकू मारत होते की, बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेला मुदस्सिर याचा भाऊ आणि आईदेखील या हल्ल्यात जखमी झाले. रक्तस्त्राव झाल्याने मुदस्सिर याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. निर्मल नगर पोलिसांनी समीर आणि शाहू या दोघांना अटक केली असून, आज, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here