महिलांसाठी विशेष राखीव बस क्रमांक 343 बससेवेचा शुभारंभ
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार गोरेगाव (पूर्व) येथील चित्रनगरी (फिल्मसिटी) मध्ये काम करत असलेल्या महिलांसाठी “आपत्कालिन 24 तास पोलीस मदत दूरध्वनीसेवा” असलेल्या फलकाचे अनावरण आणि “महिलांसाठी विशेष राखीव अश्या बससेवेचा (बस क्र. 343)” शुभारंभ आमदार रविंद्र वायकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, मुंबई उपमहापौर सुहास वाडकर, बेस्ट समिती अध्यक्ष प्रविण शिंदे, युवासेना कार्यकारिणी सदस्या सौ. शीतल देवरुखकर – शेठ यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी नगरसेविका सौ. रेखा रामवंशी, उपविभागप्रमुख बाळा साटम, शाखाप्रमुख प्रदीप गांधी, भाई परब, बाळा तावडे, संदीप गाढवे, विभाग युवा अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमित पेडणेकर, रामटेक लोकसभा विस्तारक सर्वेश गुरव, उपविभाग अधिकारी वैभव कांबळे, युवतीसेना विभाग अधिकारी सोनाली बेलवलकर, पूजा वारीसे, श्रुती मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.







