नाशिकमध्ये खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा

khandani

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – चाकूचा धाक दाखवून व्याजाच्या पैशासाठी तगादा लावणे व खंडणी मागणार्‍या दोघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

किरण दत्तू शेळके (रा. कपालेश्वर मंदिरासमोर) व नागेश चंद्रकांत शेलार (रा. नागचौक) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत प्रवीण निकाळे (रा. हिरावाडी रोड) यांने फिर्याद दिली आहे.त्यानुसार, गुरुवारी (दि. 10) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोघे संशयित फिर्यादी अनिकेतच्या घरी आले व चाकूचा धाक दाखवून व्याजाने दिलेल्या पैशाची मागणी करू लागले. तसेच शेळके गॅँगला दरमहा पाच हजार रुपये न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

 

 

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस उपनिरिक्षक यु. आर. गवळी तपास करत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here