संगीत द्रौपदी नाटकाच्या शताब्दी सांगतेनिमित्त द्रौपदी आणि बालगंधर्व या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन

balgandharva

पुणे (उपसंपादक अमोल सोळंके) – नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर लिखित संगीत द्रौपदी नाटकाच्या शताब्दी सांगतेनिमित्त द्रौपदी आणि बालगंधर्व या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. 12 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले आहे.

pune-programe

माजी केंद्रीय कृषीमंत्री, पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या 80व्या वाढदिवसाचे निमित्त साधून हा कार्यक्रम होत आहे. या वेळी संगीत द्रौपदी नाटकातील दोन प्रवेश तसेच बालगंधर्वांच्या जीवनातील निवडक प्रसंग व नाट्यगीतांचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गायिका बकुळ पंडित, सुरेश साखवळकर, रवींद्र कुलकर्णी व अस्मिता चिंचाळकर हे गायक कलावंत असून राहुल गोळे (ऑर्गन), केदार कुलकर्णी (तबला), प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष स्वप्निल दुधाणे, गणपतराव तथा आप्पा बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे व कादरबक्श खाँ साहेब यांची संगीत नाट्य रंगभूमीवरील परंपरा पुढे चालविणार्‍या अनुराधा राजहंस, ज्योत्स्ना बडवे, रूपा बावळे, राहुल गोळे, दीपक टेंबे, खाँ साहेब फैय्याज हुसेन खाँ व अन्वर कुरेशी यांचा सत्कार या कार्यक्रमात पंडीत पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून कोविडच्या नियमांचे पालन करून साजरा केला जाणार आहे, असे सुनील महाजन, संवाद पुणे (मो. 9371010432) व प्रसिद्धी माध्यम समन्वयक : प्रसन्न पाध्ये (मो. 9922907801) यांनी कळविले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here