दौंड तालुका अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. भूषण राजाराम दिवेकर यांची बहुमताने निवड

दौंड तालुका अॅडव्होकेट

दौंड (तालुका प्रतिनिधी विकास साळुंके) | येथील दौंड तालुका अॅडव्होकेट बार असोसिएशनची सन २०२६ ते २०२७ या वर्षासाठीची वार्षिक निवडणूक दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. भूषण राजाराम दिवेकर यांची बहुमताने निवड करण्यात आली.

 

या निवडणुकीत उपाध्यक्षपदी अॅड. राहुल साहेबराव घोगरे यांची निवड झाली. महिला राखीव उपाध्यक्षपदी अॅड. सौ. जयश्री संतोष गायकवाड, सहसचिवपदी अॅड. करिष्मा सल्लामुद्दीन खान तसेच सदस्यपदी अॅड. महेश संतोष काळे यांची बहुमताने निवड करण्यात आली.

तसेच सचिवपदी अॅड. सुमित वसंत लडकत, खजिनदारपदी अॅड. अभिराज संतोष भोसले, हिशोबनीस म्हणून अॅड. अरविंद बाळू कोळपे, ग्रंथपाल म्हणून अॅड. सचिन शांतिलाल रणसिंग तसेच महिला सदस्य म्हणून अॅड. सारिका विठ्ठल कुंडले आणि अॅड. हर्षल दिलीप शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. पी. जे. फुलारी यांनी जबाबदारी पार पाडली. तसेच सहायक निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. एस. एच. शेलके यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी अॅड. संतोष आढाव, अॅड. रूपचंद अंबोळरे व अॅड. किरण लोंढे यांनी सहकार्य केले.

दौंड तालुका अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी काळात वकील बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here