ज्योती देवी अन्नपूर्ण भोजनालयाचा गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

jyotidevi-bhojanalaya

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथील मा.नगरसेविका कै.ज्योती देवी बयस यांच्या स्मरणार्थ बयस परिवारातर्फे धरणगाव येथील श्री जी जिनिंग जवळ भोजनालय सुरू करण्यात आले असून त्यांचे उद्घाटन पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

 

30 रुपयात पोटभर जेवण रोज किमान 300 नागरिक चा भोजनाचा लाभ घेऊ शकतील असा स्तुत्य उपक्रम जीवन आप्पा बयस यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ सुरू केला.

 

या प्रसंगी श्री डी जी पाटील प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी,प्रा.डी आर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, मा.नगराध्यक्ष सुरेश चौधरी, ग्रंथालय सेनेचे महाराष्ट्र उपप्रमुख पी एम पाटील सर, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नयन सेठ गुजराती,चर्मकार समाज अध्यक्ष भानुदास आप्पा विसावे,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,नगरसेवक पप्पू भावे,विजय महाजन,वासुदेव चौधरी, विलास महाजन,धीरेंद्र पूर्भे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here