बेळगावच्या रायबागमध्ये महिलेवर अ‌ॅसिड हल्ला

belgaon-acide-attack

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील रायबागमध्ये एका महिलेवर अ‌ॅसिड हल्ला झाला आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार भर बाजारपेठेमध्ये घडला. यामुळे एकच खळबळ उडाली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेवर अ‌ॅसिड हल्ला झाला, ती महिला बाजारपेठेत भाजी विकण्याचे काम करते. तेव्हा एका अज्ञाताने येऊन तिच्या अंगावर अ‌ॅसिड फेकले आणि तिथून पळ काढला. यात ती महिला गंभीर जखमी झाली. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्या महिलेच्या अंगावर पाणी टाकले. यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि तिला पुढील उपचारासाठी बेळगावला हलवण्यात आले. दरम्यान, रायबाग पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here