करणी काढून देतो सांगून देवर्षीचा महिलेवर बलात्कार

संग्रहित-छायाचित्र

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – ‘तुझ्या घरावर करणी झाली आहे. माझ्यात दैवी शक्ती असून, मी घरावरची करणी काढून देतो, अशी बतावणी करत देवर्षीने गडहिंग्लमधील एका महिलेवर बलात्कार केला आहे. या प्रकरणी स्वयंघोषित देवर्षी बाळू धोंडिबा दळवी (वय ४९ रा. शिरसंगी, ता. आजरा) याला नेसरी पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पीडित महिलेने नेसरी पोलिसांत तक्रार दिली आहे.

 

बाळू धोंडिबा दळवी हा स्वतःला एका संताचा अवतार समजतो. यातून त्याचे या परिसरात मोठ्या प्रमाणात भक्त झाले आहेत. यातून शिरसंगीसह आजरा, गडहिंग्लज तालुक्यात आपल्या भक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबारही चालविला होता. यातूनच बाळू धोंडिबा दळवीसह सावंतवाडी येथील लक्ष्मण सुतार या दोघांनी सदर पीडित महिलेशी ओळख वाढविली. यानंतर ‘तुमच्या घरावर करणी झाली आहे तसेच तुमच्या घरात सोन्याचा खजिना आहे तो आम्ही मिळवून देतो, अशी बतावणी केली. सदर महिलेने यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील आपल्या राहत्या घरी येण्याची संमती दिली. यानंतर बाळू दळवी याने सदर महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. याशिवाय लक्ष्मण सुतार व अन्य दोन इसमानी जादूटोणा व अघोरी कृत्य करुन पीडितेला त्रास दिला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here