कार्तिकी गायकवाड अडकली विवाहबंधनात

kartiki-gaikwad

मुंबई (चित्रपट विभाग प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाडने व्यावसायिक रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. जुलै महिन्यात कार्तिकीचा साखरपुडा पार पडला. आता मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि गायिका आर्या आंबेकर यांनी सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

 

‘घागर घेऊन’, ‘नवरी नटली’ यांसारख्या खर्ड्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना वेड लावणारी कार्तिकी अनेकांच्या लक्षात आहे. लॉकडाउनच्या काळात म्हणजेच जुलै महिन्याच्या सुरुवातीला कार्तिकीचा शुभविवाह ठरला आणि साखरपुडाही पार पडला. कार्तिकीने सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना ही सुखद बातमी दिली होती.
कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. गायकवाड कुटुंब आळंदीत राहत असून कार्तिकी आपले वडील आणि गुरू कल्याणजी गायकवाड यांच्या संगीताचा वारसा चालवते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here