दोंडाईचा (प्रतिनिधी संतोष कोळी) – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने दोंडाईचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे अमित पाटील भूपेंद्र धनगर अखिल भारतीय कोळी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष पत्रकार संतोष कोळी, एडवोकेट मराठे माझे शिक्षण समिती सभापती राजू शेख छोटू भाऊ सांगळे माजी नगरसेवक दिलीप पाटील प्रतिक देशमुख माजी नगरसेवक नंदलाल सोनवणे विनोद टाक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत धुळे येथील माजी आमदारअनिल अण्णा गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे,प्रदेश उपाध्यक्ष यांनी रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी येणाऱ्या नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपालिका काबीज करणार कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे यावेळी मत व्यक्त केले




