मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – ठाणे महानगरपालिकेची हद्द संपते व मीरा भाईंदर महापालिकेची हद्द सुरु होते. त्याठिकाणी अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतच्या नव्याने होणाऱ्या उन्नत मार्गाची पहाणी खासदार राजन विचारे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यासमवेत केली.
यावेळी उपस्थित आमदार गीता जैन, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विभाग प्रमुख दिलीप माणिकराव ओवळेकर, ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा, स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर, नगरसेवक राजू भोईर, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल सावंत, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, जयराम मेसे, एम. एस. आर. डी. सी. चे मुख्य अभियंता सोनटक्के, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुंबई पश्चिम प्रदेशचे सुनील लिमये, वनरक्षक मलिक अर्जुन, उपमुख्य वन संरक्षक ठाणे गजेंद्र हिरे, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन, मीरा – भाईंदर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त दिलीप ढोले, पोलीस आयुक्त सदानंद दाते, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे अमित काळे, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी अग्रवाल व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.







