जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दिनांक 12 रोजी जळगाव विश्व हिंदू परिषद संचालित सेवा वस्तीमध्ये वरणगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षक प्रमुख नितीनजी शिंपी यांचेकडून स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तंट्या भिल्ल वस्ती येथील लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले

सदरील उपक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक भाऊ लाडवंजारी व सुनील भाऊ माळी तसेच जन्मत प्रतिष्ठानचे संस्थापक पंकज नाले सर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्रजी भावसार विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री दीपकजी दाभाडे विश्व हिंदू परिषदेचे महानगर सेवा प्रमुख भूषणजी क्षत्रिय तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते सदरील कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्रजी भावसार यांनी सर्व सामाजिक संस्थांना असे आव्हान केले आहे की ज्या सेवा वस्ती आहेत त्या ठिकाणी मुलांना कपडे नाहीत खायला अन्न नाही शिक्षणाची व्यवस्था नाही अशा ठिकाणी सामाजिक संस्थांनी मदतीचा हात देण्याची गरज आहे







