यावल (तालुका प्रतिनिधी डॉ मोहन साळुंके) – फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या ‘फैजपूर शहर उपाध्यक्षपदी मोहंमद आसिफ मोहंमद तय्यब यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे नियुक्ती पत्र काँग्रेस जिल्हा सरचिटणीस केतन किरंगे,काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार,नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, शहर अध्यक्ष शेख रियाज,सातपुडा अर्बन पतसंस्था व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मनोहर नेमाडे,पिंटू हंसकर उपस्थित होते.
मोहंमद आसिफ यांच्या निवडीबद्दल आ शिरीष चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप भैया पाटील, यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे युवक काँग्रेस रावेर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष वसीम जनाब, युवक काँग्रेस रावेर विधानसभा क्षेत्र सचिव मुद्स्सर नजर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारीउपस्थित होते तसेच पत्रात म्हटले आहे की काँग्रेस पक्षाला शहरात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून पक्ष वाढविण्याचे कार्य करण्याचे म्हटले आहे शेख आसिफ यांची निवड झाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.







