मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण , पर्यटन व राज्यशिष्टाचार मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार रक्त संकलनाकरिता युवासेनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तातडीने ‘ महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभुमीवर जोगेश्वरी पूर्वेकडील स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे विभाग युवा अधिकारी अमित पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली वॉर्ड क्र ७४ च्या युवासेना पदाधिकाऱ्यानी रविवार दि १३ डिसेंबर, २०२० रोजी दुर्गानगर येथील सुखसागर मंगल कार्यालयामध्ये महारक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. युवकांनी या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आवडीने रक्तदान केले. एकूण ७९ बाटल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर हॉस्पिटलच्या रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले. याप्रसंगी आमदार व राज्यमंत्री श्री रविंद्र वायकर, युवासेनेचे सरचिटणीस श्री अमोल कीर्तिकर, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, नगरसेवक व बेस्ट कमिटी अध्यक्ष श्री प्रवीण शिंदे, नगरसेवक व सुधार कमिटी सदस्य अनंत नर, माजी नगरसेवक व संपर्कप्रमुख शैलेश परब, रचना सावंत, उपविभाग संघटक प्रियंका आंबोळकर, उत्तरा नायर, उपविभाग प्रमुख के एल पाठक, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, उपविभाग। समन्वयक संदीप कोठारकर, महेश गवाणकर, शाखाप्रमुख मंदार मोरे, प्रदीप गांधी, सुभाष मांजरेकर, नंदू ताम्हणकर, उदय हेगिष्टे, उमेश कदम, महिला शाखा संघटक रश्मी गोडांबे, संजीवनी दणदणे, शाखा समन्वयक अपर्णा दातार, उपशाखाप्रमुख योगीत पाटील, दीपक पवार, केशव चव्हाण, बाबू टेमकर, विधानसभा समन्वयक अंकुर नारकर, शाखा अधिकारी तुषार राणे, समाजसेवक श्री अनुरुद्र नारकर, भाई मिर्लेकर, अनिल म्हसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरास डॉ राहुल पाठक व ट्रामा केअर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.








