महेंद्र महाजन यांची रावेर ओबीसी सेल राष्ट्रवादी पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड

mahendra-mahajan

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – जळगाव राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राचे ओबीसी विभागाचे प्रभारी उमेश नेमाडे (माजी नगराध्यक्ष,भुसावळ)यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या बैठकीत रावेर ओबीसी विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,व नियुक्तीपत्राचे वाटप उपस्थित सदस्य यांना करण्यात आले.

 

तसेच या कार्यक्रमाचे आयोजन कृषी तंत्र विद्यालय,वडगावरोड,निंभोरा येथे दि १३डिसेंबर २०२०, रविवारी करण्यात आले होते. सुनील भागवतराव कोंडे, तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी ओबीसी विभाग,रावेर यांनी महेंद्र संतोष महाजन कुंभारखेडा यांची रावेर तालुका ओबीसी सेल उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली, यावेळी माजी आमदार अरुण पाटील रावेर, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,गुणवंत नीळ,वाय डि पाटील,सह अनेक मान्यवर मंडळी चर्या हस्ते महेंद्र महाजन यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.व पुढिल वाटचालीसाठी मार्गदर्शक सूचना, शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास ताठे, मनोहर गायकवाड, हर्षल ठाकरे, रविंद्र कोळी, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here