महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ यांच्या माध्यमातून पदाधिकारी निवड

akshay-mahajan

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – तालुक्यामध्ये महाराष्ट्र दिव्यांग विकास महासंघ या संस्थेची स्थापना करण्यात आली.संस्थापक अध्यक्ष पी.एम.पाटील यांच्या हस्ते दिव्यांग संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून अक्षय महाजन यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी तर संजय भाऊ पाटील यांची धरणगाव तालुका अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

संघटनेच्या माध्यमातून धरणगाव तालुक्याचा दिव्यांग बांधवांचा विकास व प्रसार कशा पद्धतीने व्हावा याविषयी पी.एम पाटील यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी दिव्यांग बांधवांनी दिव्यांगबद्दल समस्यांबाबत प्रश्न विचारले असता, पी.एम.पाटील यांनी अतिशय पद्धतशीरपणे व सविस्तरपणे समस्यांचे निरसन केले.

जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. 35 किलो धान्य, घरकुल योजना, व विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन केले. लवकरच धरणगाव शहरामध्ये दिव्यांग बांधवांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. मेळाव्याची दिनांक निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल.अंत्योदय योजनेचे फॉर्म आधीच वाटप केलेले आहे.तरी ते भरून त्यावेळेस सोबत आणावे. सोबत येताना प्रत्येकाने मास्क लावून यावे तसेच सोशल डिस्टनचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here