काकाने केला पुतणीचा विनयभंग; गॅलरीतून उडी घेऊन पुतणीची आत्महत्या

vinaybhang

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – सुट्टीसाठी आलेल्या पुतणीचा काकाने विनयभंग केला. काकाकडून होणारे गैरकृत्य सहन न झाल्याने पुतणीने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. एप्रिल २०१८ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत विनयभंगाचा प्रकार घडला.

 

या प्रकरणी मयत मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गौरव सोपान नारखेडे (वय ३०, रा. कलावती लॉन्ससमोर औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे पती वारले आहेत. त्यामुळे फिर्यादी मुलीसह भोसरी येथे राहतात. फिर्यादींची मुलगी सुट्टीसाठी औरंगाबाद येथे काकाकडे गेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here