पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील एक लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी (११ डिसेंबर) वाल्हेकरवाडी येथे घडला.
या प्रकरणी नितीन दत्तात्रय खताळ (वय २७, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचा दरवाजा तोडून कपटातील १ लाख ५७ हजार रुपयांचे दागिने चोरले.







