बालगंधर्व संगीत महोत्सव 1 जानेवारीपासून रंगणार!

balgandrava-sangee

छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत होणार कार्यक्रम

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – भारतीय अभिजात संगीताचा खान्देशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून नावारूपास आलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दिनांक 1, 2 व 3 जानेवारी 2021 रोजी करण्यात येणार आहे.

 

 

हा महोत्सव छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिरात संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत संपन्न होणार आहे. Covid-19 या महामारी या पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन होत असल्यामुळे शासनाच्या नियमांच्या व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून हा महोत्सव साजरा होणार आहे. नाट्य मंदिराच्या एकूण आसन क्षमतेच्या 50% रसिकांनाच या महोत्सवास उपस्थित राहता येणार आहे. सोशल डिस्टंसिंग, शरीराचे तापमान, सॅनिटायझेशन, मास्क लावूनच रसिकांना प्रवेश मिळणार आहे.

 

 

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र संस्कृती केंद्र उदयपूर यांच्या माध्यमातून साजरा होणार्‍या या 19 व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टीम लि. भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, श्री महावीर सहकारी बँक लि. हे असून भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगाव चे नाव अधोरेखित करणार्‍या या महोत्सवात यावर्षीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.

 

 

महोत्सवाची सुरुवात दि. 1 जानेवारी रोजी प्रथम सत्रात सुर नवा ध्यास नवा फेमअसलेल्या तरुण, उदयोन्मुख आणि आश्वासक अशी कलावंत शरयू दाते हिच्या गायनाने होणार आहे. द्वितीय सत्र वेणू वादनाने अर्थात बासरी वादनाने संपन्न होणार आहे द्वितीय सत्राचे कलाकार आहेत मुंबई येथील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत अश्विन श्रीनिवासन. त्यांना तबल्याची साथ ओजस अढिया तर गिटार ची साथ कलकत्याचे संजोय दास करणार आहेत

 

द्वितीय दिनाची सुरुवात कलकत्ता येथील संगीत रिसर्च अकादमीचे गुरु ओमकार दादरकर यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबला संगत पुण्याचे चारुदत्त फडके तर संवादिनी संगत पुण्याचेच मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र प्रख्यात नृत्यांगना व अभिनेत्री शर्वरी जमेनिस व सहकारी हे कथक नृत्याच्या माध्यमातून बॉलीवूड फूट प्रिंट्स हा नृत्याविष्कार सादर करणार आहे.

 

तृतीय दिनाचे प्रथम सत्र ओरिसा येथील गोटीपुवा या लोकनृत्याचे सादरीकरण समूह नृत्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. या नृत्य प्रकारा वरूनच ओडिसी डान्स ची निर्मिती झाली आहे. या सादरीकरणालाच लागून भुवनेश्वर येथील प्रख्यात नृत्यांगना सुश्री मोहंती यांचे ओडिसी नृत्य सादर होणार आहे. 19 व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा समारोप एका वेगळ्या आणि अनोख्या आविष्काराने करणार आहोत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here