काल रात्री भुसावळात घडला गोळीबाराचा थरार

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील आंबेडकर नगरातील ज्ञान केंद्राजवळ तरुणावर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.४० वाजता घडली. त्यात आदित्य संजय लोखंडे (वय १९, रा.आंबेडकर नगर) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनुसार, शहरातील रेल्वे हॉस्पिटलजवळील आंबेडकर नगर, ज्ञानकेंद्राजवळ या तरुणावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी हे जखमींची जाब-जबाब घेण्यासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये रवाना झाले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here