शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री महोदयांना पाठवले निवेदन
वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – दिनांक : 14/12/2020 वार्ताहार-मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना मा. शिक्षणाधिकारी (माध्या) श्री.बी.जे.पाटील साहेब व प्राथमिक संघटनेने उपशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र सपकाळे साहेब व श्री विजय पवार साहेब यांच्यामार्फत 11 डिसेंबर 2020 चा अन्यायकारक शासन निर्णय त्वरित रद्द करणेबाबत नारायण वाघ ,सोमनाथ पाटील यांनी निवेदन पाठवले.

या निवेदनात राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीने आकृतीबंध निश्चित न करता शिक्षण विभागाने 11 डिसेंबर 2020 ला ठोक मानधनावर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा निर्णय घेतला आहे., 11 डिसेंबर 2020 चा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदींशी विसंगत आहे, उपरोक्त कायदा किंवा किमान वेतन कायदा यात अद्यापी विधिमंडळाने बदल केले नसल्याने अशाप्रकारे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमणे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी ( शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामठी, तेलवाला, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी) शाळेचा अविभाज्य घटक असून त्याची मानधनावर नियुक्ती करून शिक्षण विभागाने त्यांचा अपमान केला आहे, 11 डिसेंबर 2020 चा बेकायदेशीर व शिक्षणाचे कंत्राटीकरण करणारा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतांना नारायण वाघ,सोमनाथ पाटील,दिपक आर्डे,आर.के.पाटील,संजय साळुंखे ,अजयकुमार पाटील,पंकज गरुड ,संदिप पाटील तसेच राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष श्री विजय नवल पाटील यांनीही शिक्षक भारती संघटनेच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे रविंद्र पाटील,मनोज पाटील, सुदर्शन पवार,भूषण पाठक,चंद्रकांत वाघ,संभाजी ओस्वार लखिचंद पाटील उपस्थित होते.
शिपाई भत्ता लागू करण्याबाबत 11 डिसेंबर 2020 चा जीआर रद्द करण्यात यावा याकरता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ नागपूर ने आज शालेय शिक्षण मंत्र्याकडे शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यामार्फत निवेदन पाठविले. याप्रसंगी उपस्थित सर्वश्री अनिल गोतमारे, विठ्ठल जुनघरे ,रमेश काकडे ,अविनाश बडे , प्रमोद रेवतकर ,धनराज राऊत , अरविंद शेंडे ,विजय गोमकर ,विष्णू राणे , रमेश पराते , जयंत बुधे , शंकर जांभूले, राजेश पोटे, जेसुजा आदी उपस्थित होते.




