महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन मीरा भाईंदर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा कार्यकारणी जाहिर

police-boys-association

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस बॉईज असोशियन ही संघटना सामाजिक व राजकीय ठिकाणी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी महाराष्ट्रातील एकमेव अराजकीय सामाजिक संघटना आहे ,व पोलीस दलात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांच्या संरक्षणासाठी काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे, या संघटनेच्या प्रयत्नाने पोलीसांच्या मुलांसाठी 5 टक्के आरक्षण मिळाले आहे, असे निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज विनायक पार्सेकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये माहिती दिली. मीरा भाईंदर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्याप्रसंगी ते बोलत होते.

mira-bhyander

 

पोलीस बॉईज असोशियन चे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ ना. वैद्य, प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी. जाधव, निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज विनायक पार्सेकर, नायगाव वसई शहर अध्यक्ष प्रशांत गणेश किणी, नालासोपारा अध्यक्ष मुनमुन पाल, यांच्या मार्गदर्शना खाली मीरा भाईंदर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा कार्यकारणी निवड केली ,यामध्ये पोलीस समिती अध्यक्ष पालघर जिल्हा सेवा निवृत्ती पोलीस अधिकारी रमेश नारायण कवटेकर, यांचे निवड केली तसेच मंगेश रमेश कवटेकर, रोहित रमेश कवटेकर, अमित नंदकुमार कुंभार, यांची मीरा भाईंदर पोलीस समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली, आणि रघुनाथ मंडळ, यांची विरार शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व राजन विश्वकर्मा यांना वसई उद्योग विभाग सदस्य म्हणून निवड करण्यात आली, सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य धीरज विनायक पार्सेकर यांच्या हस्ते निवृत्ती पत्र ओळखपत्र देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायगाव वसई शहर अध्यक्ष प्रशांत गणेश किणी व नालासोपारा अध्यक्ष मुनमुन पाल यांनी केली

police-boys

 

कार्यक्रमास प्रो. भास्कर पैठणकर, यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच उपजिल्हा अध्यक्ष मीरा-भाईंदर मनोज कोतवाल सचिव मीरा -भाईंदर सुरेश कोरडे वाहतूक विभाग मीरा भाईंदर विभाग अध्यक्ष सरुण विश्वकर्मा वाहतूक विभाग नायगाव -वसई विभाग अध्यक्ष किरण विष्णू साळुंखे तसेच मीरा भाईंदर सदस्य दशरथ बाबू शिरिष्कर , कमलेश सिंग, अरुण सिंग हस्मुख सुतार, राकेश बोहिनी, निलेश कुळे, रवी मोर्या, राकेश मालविया, दिलीप मालविया व मीरा-भाईंदर शहरातील महिला आघाडी आणि नायगाव -वसई- नालासोपारा -विरार या सर्वांनी उपस्थिती दाखवून मीरा-भाईंदर शहरातील उपाध्यक्ष मनोज कोतवाल यांनी सर्वांचे आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here