नाशकात चौघांनी संपवले जीवन

sucide

नाशिक (विशेष प्रतिनिधी कुबेर जाधव) – शहरात आत्महत्येचे प्रमाण वाढले असून सोमवारी (दि.14) एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात राहणार्‍या चौघांनी आत्महत्या केली. त्यातील तिघांनी गळफास लावून तर एकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.

नवीन नाशिक येथील रूपेश भटू कासार (40) यांनी सोमवारी (दि.14) आपल्या राहत्या घरातील किचनमधील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी दिनेश कासार (रा.कामटवाडा) यांनी खबर दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.

दुसरी घटना जेलरोड भागात घडली. अमोल सतिष हिरे (29 रा.भिमनगर,जेलरोड) या युवकाने सोमवारी रात्री अज्ञात कारणातून नाशिकरोड येथील पवन हॉटेल येथे गळफास लावून घेतला होता. त्यास तात्काळ बिटको हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वडघुले करीत आहेत.

सातपूर गावातील भंदूरे वाड्यात राहणाऱ्या रोहिदास भीमराव वाघमारे (47) यांनी रविवारी (दि.13) मध्यरात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या आड्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अक्षय वाघमारे यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुर्यवंशी करीत आहेत.

 

प्रविण बाळकृष्ण देवरे (28 रा.गणेशनगर,अमृतधाम) या युवकाने सोमवारी (दि.14) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here