पुण्यात डोक्यात सिमेंट ब्लाॅक घालून कॅब चालकाला लुटण्याचा प्रयत्न

pune-crime

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कॅबचालकास लूटण्याच्या उद्देशाने डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घालून मारहाण करण्यात आली. ही घटना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी पाठलाग करुन एका अल्पवयीन मुलासह तीघांना ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी रात्री अडीचच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथे घडली.

 

 

उमेशकांत कुमार गौतम उर्फ उभ्या (22,रा.वडगाव बुद्रुक) व कोळ्या नाना राऊत उर्फ शंकर(18,रा.जनता वसाहत, पर्वती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस उपनिरीक्षक विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. अरुण रंगनाथ लांडे(42,रा.फुरसुंगी) असे जखमी कॅबचालकाचे नाव आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लांडे हे कॅबचालक असून ते त्यांची कॅब घेऊन रस्त्याने चालले होते. यावेळी दुचाकीवरुन ट्रीपल सीट आलेल्या आरोपींनी त्यांच्या गाडीवर सिमेंट ब्लॉक टाकला. गाडीची काच फुटल्याने ते थांबले. यावेळी तीघांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच डोक्‍यात सिमेंट ब्लॉक टाकून लाथा-बुक्‍यांनी मारहाण केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक धुमाळे करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here