क्रिकेटच्या वादातून अल्पवयीन मुलाचा चाकूने भोसकून खून

knief-attack

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून तीन महिन्यापुर्वी झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना कराडमधील मुजावर कॉलनीत घडली. आदित्य गौतम बनसोडे असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सादिक अत्तार, यश भोसले आणि एक अनोळखी, अशा तिघांची नावे संशयीत म्हणून समोर आली आहेत. गौतम बनसोडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयीत तरूणांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना केली आहेत.

 

आदित्य बनसोडे हा सोमवारी दुपारी पावणे पाचच्या सुमारास बाराडबरी परिसरात रत्न वैभव किराणा स्टोअर्ससमोर उभा होता. त्यावेळी त्याला चाकूने भोसकण्यात आले. तो रक्ताच्या थोराळ्यात पडला. आदित्यने आरडाओरडा केल्यामुळे संशयीत घटनास्थळावरून पसार झाले. चाकूने भोसकल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. हा प्रकार पाहून नागरिक घटनास्थळी धावले आणि त्यांनी आदित्यला कराड उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला कृष्णा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयितांच्या शोधासाठी तात्काळ पोलीस पथके रवाना केली. आदित्यचे वडिल गौतम बनसोडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संशयिताच्या शोधासाठी पथकेही रवाना करण्यात आली आहेत. अल्पवयीन मुलाच्या खुनामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here