मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात ‘बर्निंग कार’ चा थरार

burning-car

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी सकाळी बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. कारमधून प्रवास करणाऱ्या पाच प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घाट चढणाऱ्या कारने अचनाक पेट घेतला. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

 

मंडणगड तालुका आरोग्य विभागात काम करणारे काही कर्मचारी मारुती बलेनो कारने रत्नागिरी येथे जायला निघाले होते. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कार भोस्ते घाट चढत असताना अचानक कारच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. हे चालकाच्या लक्षात येताच त्याने कार थांबवून कारमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांसह अन्य प्रवाशांना कारमधून बाहेर काढले. कारमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी बाहेर पडताच कारने पेट घेतला. कारमधील प्रवासी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यामुळे ते थोडक्यात बचावले.

कार चालकाने या दुर्घटनेची माहिती खेड पोलिसांना देताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खेड नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आणि महामार्गावरील वाहतुक सुरळीत सुरू झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here