20 हजार व दारूची बाटली लाच म्हणून घेताना उपनिरीक्षक जेरबंद

corrupt-police-officer

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – गुन्ह्यात जप्त झालेले मोबाईल फोन परत देण्यासाठी तसेच त्या गुन्ह्यात वडिलांचे नाव समाविष्ट न करण्यासाठी एकूण 40 हजार व ब्लेंडर प्राईड दारूची बाटली लाच म्हणून मागून तडजोडअंती ठरलेली वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना चारकोप पोलीस ठाण्याचा उपनिरीक्षक अॅण्टी करप्शन ब्युरोच्या कारवाईत ट्रप झाला.

 

रामकृष्ण (नाव बदललेले) यांची काही दिवसांपूर्वी केलेल्य हाणामारीत एका व्यक्तीला डोक्याला दुखापत झाली. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रामकृष्ण आणि त्यांच्या दोघा भावांवर कारवाई झाली. यात रामकृष्ण यांचे मोबाईल व घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला होता. हे मोबाईल आणि डीव्हीआर पुन्हा मिळावे यासाठी रामकृष्ण यांनी उपनिरीक्षक भारत ढेंबरे यांना ही लाच देताना रंगेहाथ पकडले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here