प्रेयसीने दिला प्रेमात दगा; प्रियकर बनला प्रसिध्द बेवफा चायवाला

बेवफा-चायवाला

भिंड (मध्यप्रदेश) – प्रेयसीच्या विरहात अनेक जण देवदास होतात. तुटलेलं हृदय घेऊन शायर होतात. पण, एक असाही प्रियकर आहे जो प्रेयसीच्या विरहामुळे चहावाला बनला आहे. सध्या हा चहावाला भलताच व्हायरल होत आहे.

 

हे दुकान आहे मध्य प्रदेशच्या भिंड इथलं. मूळचा मालनपूरचा असलेला दीपक परिहार हा या दुकानाचा मालक आहे. दीपक याची एक प्रेयसी होती आणि तिने त्याच्याशी असलेल्या नात्यात विश्वासघात केला. त्याचा प्रेमभंग झाला आणि त्या दुःखात त्याने चहाचं दुकान सुरू केलं. त्याने त्याच्या या चहाच्या दुकानाला नावही बेवफा चायवाला असं दिलं आहे.

befavfa-chaiwala

या दुकानात प्रेमी युगुल चहा पिण्यासाठी आलं तर त्या जोडप्याला 20 रुपयात चहा दिला जातो. तर ज्याचा प्रेमभंग झाला असेल त्याला 15 रुपयात चहा दिला जातो. सध्या या चहावाल्याची सोशल मीडियावर चांगलीच हवा झाली आहे.

 

दीपकच्या म्हणण्यानुसार, त्याला लहानपणापासूनच देशाची सेवा करायची होती. त्यामुळे सैन्यातही भरती व्हायचं होतं. पण काही कारणास्तव ते राहून गेलं. आता दुकानावर येणाऱ्या सैनिकांना तो मोफत चहा पाजतो. देशाचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांचं समाजातलं स्थान हे सदैव आदरणीय असतं, हाच संदेश आपण लोकांना देऊ इच्छित असल्याचं दीपक सांगतो.

 

या बेवफा चायवाल्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. विशेषतः त्याच्या दुकानाचं नाव ऐकून लोक त्याचा चहा पिण्यासाठी येत आहेत. दीपकही त्यांचा पाहुणचार करून आपला व्यवसाय जोमाने पुढे नेण्याच्या विचारात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here