दुर्गा पूजेच्या मंडपात चेंगराचेंगरी, १९ भाविकांचा मृत्यू

चेंगराचेंगरी

कोलकाता (वृत्तसंस्था) | उत्तर कोलकाता भागातील प्रसिद्ध चोरबागान दुर्गा पूजा मंडपामध्ये शनिवार रात्री उशिरा चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांचा आकडा १९ वर पोहोचला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एकूण २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहेत. मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जोरदार पाऊस सुरू असताना चोरबागान सार्वजनिक दुर्गा पूजा मंडपामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. लहान गल्ल्या, पावसापासून बचावासाठी लोकांची धावाधाव आणि पूजा मंडपात शिरण्यासाठी लोकांनी केलेली घाई… तसेच गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे ही चेंगराचेंगरीची उडाली.

या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तातडीने कोलकाता मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे १७ जणांना मृत घोषित करण्यात आले, तर उपचारादरम्यान आणखी दोघांचा मृत्यू झाला. जखमींपैकी २४ जण धोक्याबाहेर असले, तरी एकाची प्रकृती अद्याप अत्यंत गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here