मुंबई (संपादक सुनिल पाटील) – केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठावावी या मागणीसाठी काल मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अवर सचिव अजय चौधरी यांना प्रत्यक्ष भेटून लेखी पत्र देऊन मागणी करण्यात आली
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे गेलेल्या शिष्टमंडळाने आघाडी सरकारमधील आमदार मंत्री यांनाही भेटून राज्य सरकारनेही केंद्राकडे कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी जोरदार पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली

14 सप्टेंबर 2020 रोजी कांद्याला निर्यात बंदी केली त्यावेळेस कांद्याचा तुटवडा होता असे केंद्र सरकारचे म्हणणे होते त्यामध्ये काहीअंशी तय्थ असले तरी आता मात्र राज्यामध्ये मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध झाल्याने तसेच कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने व कांद्यासाठी पोषक हवामान असल्याने येणाऱ्या काळात जास्तीचा कांदा उत्पादन होणार असल्याने केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता तात्काळ ही निर्यात बंदी उठवावी अशी मागणी यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्याकडे करण्यात आली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला सांगितले की केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा करून तात्काळ कांद्यावरील निर्यात बंदी हटवली जाईल असे मी तुम्हास आश्वस्त करतो.
यावेळी शिष्टमंडळाने आघाडी सरकारच्या काही आमदारांनाही प्रत्यक्ष भेटून राज्य सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्यासाठी केंद्राकडे जोरदार मागणी करावी असे साकडे घातले
राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्यासह नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, धुळे जिल्हाध्यक्ष संजय भदाणे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार, मालेगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत शेवाळे, कळवण तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, कोपरगाव तालुकाध्यक्ष वसंत देशमुख, येवला तालुकाध्यक्ष विजय भोरकडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष शेखर कापडणीस, जिल्हा समन्वयक भगवान जाधव, सुनील ठोक किरण सोनवणे, समाधान गुंजाळ, दिगंबर धोंडगे, नयन बच्छाव, हर्षल अहिरे, भाऊसाहेब शिंदे, कैलास जाधव, सुरेश ठोक, आबा आहेर, ज्ञानेश्वर ठोक, गंगाधर मोरे, आदी कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.







