खाजगीकरणातून डायग्नोस्टीक सेंटर सुरू करा.सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ पाठपुरावा करणार
मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – बदलापुर शहरातील लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे.बदलापुर शहरातील तमाम सर्व नागरिकांनी सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या अधिपत्याखाली एकत्र येण गरजेच आहे. ब-याच नागरी सुविधा नगरपरिषदेशी निगडीत आहेत. तसेच बदलापुर शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने M.M.R.D.A यांनी मंजुर कलेला विकास आराखडा प्लान सहीत नगरपरिषदेने जनहीतार्थ सर्व नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या विकास आराखड्या संदर्भातील फलक बदलापूर शहरातील चौका चौकात लावावेत.तसेच जनतेला कल्याण-डोंबिवली, ठाणे,मुंबई याठिकाणी उपचारासाठी जावे लागते, लोकसंख्ये नुसार बदलापुरात सुसज्ज हाॅस्पिटल नाही. त्यासाठी महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधुन नगरपरिषदेच्या पुढाकाराने खाजगी करणाच्या माध्यमातून डायग्नोस्टीक सेंटर सुरू करण्याची मागणी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने केलेली आहे.महासंघाच्या पदाधिकारी व कोअर कमिटी सदस्यांनी या विविध नागरी सुविधा संदर्भात नगरपालिकेला ई मेलद्वारे निवेदने पाठविण्यात आलेली आहेत.
बदलापुर शहर हे सुज्ञ,सजग,सुशिक्षित नागरीकांचे शहर आहे. आपल्या विविध नागरी सुविधा संदर्भातील मागण्या नगरपरिषदेकडे ई मेल द्वारे पाठविणे आपले कर्तव्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे पदाधिकारी प्रत्यक्ष भेटुन विचारविनीमय करतीलच.याकरिता समस्त बदलापुरकर नागरीकांनी त्वरीत अतिशय उत्स्फूर्तपणे http://Email:[email protected] या ई मेल आयडीवर आपल्या नागरी सुविधा संदर्भातील स्वतःच्या नावाने निवेदन पाठवावे.अशी विनंती जेष्ठ बदलापुरकर,महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक व मुख्य निमंत्रक बाळासाहेब सावंत यांनी केली आहे.अशी माहिती गुरुनाथ तिरपणकर यांनी दिली आहे.







