शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे मास्क न वापरल्याने विद्यार्थ्यास पोलिसांकडून विद्यार्थ्यास जबर मारहाण करण्यात आली असून जो पर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा देत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की महिनाभरापूर्वी प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱ्या विरोधात मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान एका विद्यार्थ्याने मास्क न वापरल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली होती.अनेक वेळेस तक्रार देऊन देखील पोलीस प्रशासनाने मार्फत तक्रारीला केराची टोपली दाखवण्यात आली म्हणून पोलीसच्या या दंडुक शाही विरोधात घटनात्मक उपोषणाचा मार्ग पिडीत विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी स्वीकारला आहे.

आमचा घटनेवर विश्वास असुन जोपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी विरोधात कायदेशिर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे . पोलीस प्रशासनाकडून उपोषण करणाऱ्याना समज देण्याचा तसेच लवकरच कार्यवाही करू असे मत Dysp यांनी व्यक्त केले परंतु संतप्त उपोषण करत्यानी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले यामुळे पोलीस प्रशासन आता काय कार्यवाही करणार ?हे बघून औत्सुक्याचे ठरेल.







