परप्रांतीय व्यापाऱ्याने केली डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची ११ लाखांना फसवणूक

dalimb-farmer

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – मालेगाव तालुक्यातील कोठारे येथील डाळींब उत्पादकाकडून परप्रांतीय व्यापाऱ्याने 11 लाख 50 हजारांचे 15 टन डाळींब घेतले. खरेदीपोटी दिलेला धनादेश वटलाच नाही. पैसे थकवून फसवणूक केल्याप्रकरणी या व्यापाऱ्याविरूद्ध वडनेरखाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोठारे येथील मदनिंसग सुरिंसग मगर यांच्याकडून मूळ ओडिसा येथील अजयिंसग शिवभजन ठाकूर याने 30 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 या काळात पंधरा टन डाळींब खरेदी केले. त्यापोटी कोटक बँकेचा 11 लाख 50 हजारांचा धनादेश दिला, मात्र तो वटला नाही. याबाबत विचारणा केली असता ठाकूरने उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मगर यांनी काल वडनेरखाकुर्डी पोलीस ठाणे गाठून ठाकूरविरुद्ध फिर्याद दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here