मै हू डॉन…म्हणत केला तरूणाच्या गळ्यावर ब्लेडने वार

attack by blade
संग्रहित छायाचित्र

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – तरूणीसोबत माझे लग्न लावून द्या. मी डॉन आहे, मर्डर केलेला असून माझ्या नादाला लागू नका. मी गुन्हेगाराच आहे, एक गुन्हा आणखीन वाढेल. अशी धमकी देऊन सराईताने तरूणाच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.मयूर राजेंद्र शिंदे (वय 28, रा. नर्‍हे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सौरभ जाधव (वय 20 रा. नर्‍हे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ आणि मयूर नर्‍हेत राहायला आहेत. सौरभ यांची एक नातलग असून तिच्याशी माझे लग्न लावून द्या अशी मागणी मयूरने दोन दिवसांपुर्वी त्यांच्या घरी जाउन केली.माझे लग्न लावून न दिल्यास तुमच्या घरातील एकालाही जिंवत सोडणार नाही. जर लवकर लग्न लावून दिले नाही, तर मी एक गुन्हेगाराच आहे असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली.

 

अरे मी डॉन आहे, मी मर्डर केलेला असून माझ्या नादाला लागू नका अशी धमकी त्याने सौरभ यांना दिली. मी कोणालाही सोडणार नाही असे म्हणत मयूरने सौरभला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर ब्लेडने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी. बी. कणसे तपास करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here