नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – नवी मुंबईत खारघर जवळ एका खासगी बसचा टायर फूटून अपघात झाला आहे. या अपघात सहा जण जखमी झाले असून सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार खारघरच्या सायन पनवेल महामार्गावर जालन्याहून मुंबईच्या दिशेने एक बस येत होती. पहाटे साडे चारच्या सुमरास या गाडीचा टायर फुटला आणि चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्यावरून उतरली आणि अपघात झाला. या अपघातात सहा जण जखमी झाले असून सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.







