ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – गोव्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बनावट दारूचे रॅकेट उद्धवस्त करण्यात अबकारी खात्याला यश आले आहे. गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात पत्रादेवी एक्साइज चेकपोस्टवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारा टेम्पो पत्रादेवी चेकपोस्टवर तपासणीसाठी थांबविण्यात आला. उपनिरीक्षक दामोदर लोलीनकर यांना संशय आला. निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या उपास्थितीत टेम्पोचे सील तोडण्यात आले. यावेळी टेम्पो मोठया प्रमाणात दारुसाठा आढळून आला.
टेम्पोत बीयर व्हिस्कीसह सुमारे 3 लाख 20 हजार रुपयांच्या दारुचे बॉक्स आढळून आले. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेला सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गिरीश डी. जोशी (45, रा. ठाणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई आज बुधवारी मध्यरात्री पत्रादेवी चेकपोस्टवर करण्यात आली.
ही कारवाई निरीक्षक अमोल हरवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर लोलीनकर, गार्ड दिगंबर कुंकळकर, बिंदेश पेडणेकर, अर्जुन गवस, असिस फर्नांडिस व विश्वास केणी यांच्या पथकाने केली.







