कुंभारखेडा चिनावल रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त सापडेना…

kumbharkheda-road
  • सा.बां अधिकारी ठेकेदाराला फक्त सुचना करतात
  • ठोस पावले उचलणार कधी?
  • परिसरातील नागरिक संभ्रमात..

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – गेल्या दोन तीन वर्षांपासून चिनावल कुंभारखेडा हा मंजूर झाला असून मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी विलास ताठे सह अनेक शेतकरी व लोकप्रतिनिधी ह्या विषयी सतत रस्ता दुरुस्ती साठी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा, आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या कडे पाठपुरावा करत आहे, यातूनच कुंभारखेडा, गावातील हा रस्ता गोडावून ते मराठी शाळेपर्यंत क्राॅगीटीकरण तर चिनावल येथे
कुंभारखेडा रोड चौफुली ते वडगाव रस्ता पर्यंत झाले आहे, तरी ह्या सिमेंट रोड च्या साईट पट्ट्या अजूनही भरल्या गेल्या नाहीत, तसेच कुंभारखेडा फाट्यावर छोटा पूल बांधण्यात आला असून त्यावर फिनीशिंग बाकी आहे,यावर माती दगड गोटे यांचा फक्त धातरुमातुर भराव टाकला आहे.

 

kumbharkheda

चिनावल कुंभारखेडा हा रस्ता प्रमुख दळणवळण चा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असते यामुळे परिसरातील शेतकरी बंधू,वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर रहदारीची मोठीं समस्या निर्माण होत असते, तरी संबंधित अधिकारी व ठेकेदार याबाबत जाणिव पूर्वक दुर्लक्ष करीत आहेत का ? याविषयीची चर्चा या परिसरातील नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

 

तरी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी याबाबत संवेदनशीलता दाखवावी, असाही प्रश्न जोर धरत आहे, म्हणून लवकरात लवकर चिनावल कुंभारखेडा हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, अन्यथा सदर शेतकरी व लोकप्रतिनिधी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here