शेतकऱ्यांना वीज, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार !
धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) -कोविड काळातही जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. धरणगाव व परिसरात अनेक नवीन बंधारे बांधले गेले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीला अखंडितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला योग्य दाबाने वीजेचा पुरवठा होण्यासाठी वीजेचे जाळे निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. पाणी हेच जीवन असून वीज व रस्ते हे विकासाचे माध्यम आहे. प्रत्येक घरात वीज , घर तेथे पाणी पोहचविन्यासाठी व रस्त्यांच्या विकासाठी कटिबद्ध असून परिसरातील 4 गावांसाठी पाटचारी द्वारे शेतीला पाणी उपलब्ध करणार असून जिल्ह्यातील नादुरुस्त ट्रान्सफर्मार च्या ऑईलसाठी 60 लाख निधी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविन्यपूर्ण मधून देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील बोरगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजने अंतर्गत बांधलेल्या 33/11 के.व्ही.उपकेंद्राच्या उदघाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ होते.

लोकार्पण होऊ घातलेल्या ३३/११ के. व्ही . उपकेंद्र बोरगाव बु. बोरगाव खु., विवरे, भवरखेडा परिसरातील ८-१० गावांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे या उपकेंद्रासाठी एकूण रुपये २ कोटी ४६ लक्ष इतका खर्च झालेला आहे. या केंद्रामुळे परिसरातील शेतकरी व वीज वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्यामुळे शेतकरी व नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
यावर्षी वरूण राजांची कृपादृष्टी चांगली असल्यामुळे सर्वच बंधारे व नद्या- नाले तुंडूब भरून ओसांडून वाहत आहेत.त्या बरोबरच अनेक ठिकाणी नवीन वीज केंद्रांची उभारणी सुध्दा केलेली असल्याने शेतकर्यांाना आता वीज व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे . बोरगाव बु व बोरगाव खु गावांसाठी पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या मार्गावर असून जलमिशन योजनेंतर्गत गाव तेथे पाणी व हर घर जल योजना राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी वेळेचर वीजबिल भरावे असे आवाहन त्यांनी केले.
ना.पाटील कृतीशील मंत्री – गुलाबराव वाघ
यावेळी गुलाबराव वाघ म्हणाले की, वीज पाणी व रस्ते साठी ना.पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले असून ना.गुलाबराव पाटील हे कृतीशील मंत्री असून विकासाचे महामेरू आहेत. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,पं. स. सभापती मुकुंदराव नन्नवरे, तालुका प्रमुख गजानन पाटील, बोरगावचे सरपंच भिकनराव मराठे, उपसरपंच रविंद्र मराठे, विलास महाजन, पप्पू पाटील, भानुदास विसावे, इंफ्राचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर , धरणगावचे कार्यकारी अभियंता रमेश कुमार पवार , मनीष धोटे, देवेंद्र चौधरी, शिरीष सोळंके, प्रोजेक्ट मॅनेजर धननिल वाणी , पं. स. सदस्य प्रेमराज पाटील, भैया मराठे,निंबा कंखरे यांच्यासह विवरे, भवरखेडा परिसरातील सरपंच, उपसरपंच ग्रा.पं. सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोरगाव बु , बोरगाव खु व परिसरातील सर्व सरपंच सर्व उपसरपंच वसर्व शाखा अभियंता आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगराध्यक्ष भानुदास विसावे यांनी तर आभार कार्यकारी अभियंता रमेशकुमार पवार यांनी मानले.







