ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – बुधवारी दि.१६/०४/२०१९ रोजी ०९:३० वाजण्याचे सुमारास शंकर मंदिराजवळ, डोंबिवली कल्याण रोड पुर्व या ठिकाणी फिर्यादी प्रदिप मधुकर ढवळे वय-३० वर्षे व्यवसाय–रिक्षा चालक राहणार सतीश किराणा स्टोअर जवळ, डोंबिवली पुर्व यांचेवर यापुर्वी अटक आरोपी अजित शरद सिंग , गणेश पुंडगे व सचिन आहेरे यांनी धारदार हत्याराने फिर्यादीस मारून जखमी केले होते. नमुद बाबत डोंबिवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर । १५२/२०१९ भा.द.वि. कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी हा सुमारे १८ महिन्यापासुन मिळुन येत नव्हता. सदर आरोपी गणेश नामदेव पुंडगे वय-२८ वर्षे राहणार गोकुळ पाटील चाळ, रांजनोलीगाव, भिवंडी हा दि.१७/१२/२०२० रोजी भिवंडी येथे येणार असले बाबत खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांना माहिती मिळाली होती. त्या अनुशंगाने भिवंडी येथे सापळा रचुन पाहिजे आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे कडे केलेल्या चौकशी त्याने गुन्हयात त्याचा सहभाग असल्याचे कबुल केल्याने त्यास रिपोर्ट सोबत डोंबिवली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले असुन पुढील गुन्हयाचा तपास डोंबिवली पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलीस आयुक्त संजय येनपुरे (गुन्हे), पोलीस उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त एन.टी. कदम, (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, पोनि. संजय शिंदे, सपोनि. जे.डी. मुलगीर, पी. एस. नाळे, पोउनि, मोहन कळमकर, पोलीस अंमलदार सपोउनि. सत्यवान सोनवणे, सुरेश मोरे, सुरेश यादव, सुभाष तावडे, मोहन चौधरी, बजरंग गोसावी, योगिराज कानडे, कल्याण ढोकणे चंद्रकांत ठाकरे, प्रशांत भुर्के, रूपेश नरे, संदिप भांगरे, महेश साबळे, हेमंत महाले. बाळ मकणे रोशन जाधव, यांनी शिताफीने पार पाडली आहे.







