नवी मुंबईत महा विकास आघाडीची बैठक झाली संपन्न; कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

mahavikas-aaghadi-meeting

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – सानपाडा येथे महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा पदाधिकारी, नगर सेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खेळी मेळीच्या वातावरणात बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना उपनेते, मुंबई झोपडपट्टी सुधार समितीचे सभापती श्री.विजय नाहटा, राष्ट्रवादी कांग्रेसचे पक्षाचे आमदार श्री.शशिकांत शिंदे, शिवसेना नेते आणि नवी मुंबई महानगर पालिका विरोधी पक्ष नेते विजय चौगुले,शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख अशोक गावडे,निरीक्षक प्रशांत पाटील, काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख अनिल कौशिक, नगर सेवक संतोष शेट्टी,नगर सेविका सौ.सरोज पाटील, शिवसेना शहर प्रमुख विजय माने इत्यादी नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

 

navi-mumbai

navi-mumbai3
महाविकास आघाडीतील मित्र पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने निवडणूकीत काम करायचे असून आपल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात प्रथम नवी मुंबईतील महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून घेण्यात आले.कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले.कार्यकर्त्यांनी पक्षीय भेद बाजूला ठेऊन एकत्र काम करण्याचे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

 

navi-mumbai1

navi-mumbai-4
पुढील काळात सोशल मीडियाची जबाबदारी तरुण कार्यकर्त्यांवर देणार असून राज्य सरकारने जनतेसाठी केलेली कामे घरा घरात आणि सामान्य जनते पर्यंत पोचवणार असल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी सांगितले.पुढील मार्च महिन्यात नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूक होणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.

 

नागरिकांच्या समस्यां सोडवण्याला अग्रक्रम देऊन महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले जाईल तसेच पुढील काळात ऐरोली विधान सभा आणि बेलापूर विधान सभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे कार्यालय उघडले जातील आणि सभा आणि बैठकांचे सत्र सुरू केले जाईल असे नाहटा म्हणाले.येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगर सेवक निवडून द्यायचे असून नवी मुबंई महानगर पालिकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकवू त्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित कामाला लागण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here