ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) – बाबासाहेब ढोल्ये व बापूसाहेब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र समविचारी मंच ठाणे जिल्हा यांची महत्वाची सभा शारदा विद्यालय,ठाणे येथे संपन्न झाली.
या सभेचे अध्यक्षस्थान ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ.प्रगती म्हात्रे यांनी भूषविले.समविचारी मंचचे महाराष्ट्र सरचिटणीस व प्रभारी रमेश कदम यांनी रेशनिंगच्या समस्या संदर्भात व आगामी धरणे आंदोलन विषयी सभेला संबोधित केले.बाबासाहेब व बापूसाहेब यांनी समविचारी मंच सारखे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.त्याचा वापर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी करतांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रकाश माळी यांनी सांगितले.
या सभेसाठी कल्याण तालुका अध्यक्ष स्वरूप बोले,ठाणे सरचिटणीस भीमराव शिरसाठ,चिटणीस सुभाष जैन यांच्यासह कोकण संपर्क प्रमुख राजेंद्र गोसावी,सदस्य ज्ञानेश्वर पाटील व बंधन वधुवर सुचक मंडळाच्या बिनीता त्रैलोक्य उपस्थित होते.सदर सभेचे सूत्रसंचालन राजेंद्र गोसावी यांनी केले तर सभा यशस्वी होण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील यांनी खूपच मोलाचे सहकार्य केले.आभार प्रदर्शन सुभाष जैन यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.







