औरंगाबाद येथे भव्य पुस्तक प्रकाशन तथा विविध राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

aurangabad-prize-distribution

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – शहरातील रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित मुक्ताबाई विद्यालय समुद्रपूर जिल्हा -वर्धा येथील कलाशिक्षक मनोज बाचले तसेच संजय गांधी स्मृती विद्या मंदिर हिंगणघाट येथील कलाशिक्षक अरविंद दहापुते गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक समाजसेवेचे व्रत घेऊन समाज प्राप्ति जागृत असणारे घटक कार्य हे दोन्ही शिक्षक नेहमी करीत असतात.

 

ते करीत असलेल्या सामाजिक शैक्षणिक कलात्मक कार्याची दखल घेत त्यांना शब्दगंध समूह प्रकाशन संघ मित्र युवा मेळावा औरंगाबाद येथे भव्य पुस्तक प्रकाशन विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिनांक 16/12/ 2020 रोजी कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमित राठोड पोलीस अधिकारी नागपुर,प्रमुख उपस्थित अंकुश त्रिभुवन, भगवान दाभाडे, सदाशिव बागडे संदीप त्रिभुवन इत्यादी यांची उपस्थिती होती. त्यांना शब्दगंध समूह प्रकाशन औरंगाबाद यांच्याकडून त्यांच्या कार्याची दखल घेत मनोज बाचले, अरविंद दहापुते यांना दिनांक 16 .12 2020 रोजी औरंगाबाद येथे महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार पोलीस अधिकारी सुनील राठोड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 

अरविंद दहापुते कला शिक्षक यांनी विद्यार्थ्यांसाठी आवड बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व या सर्व बाबींचा विचार करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. मनोज बाचले यांनी विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम चित्रकला रांगोळी, विविध स्पर्धा तसेच ऑनलाइन विविध स्पर्धा घेण्यात आले. कला शिक्षक यांनी दरवर्षी फलक लेखनातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संचालन संदीप भदाणे तसेच आभार प्रदर्शन संगीता दाभाडे यांनी केले. आयोजन संपादक तसेच स्वराज्य न्यूज 24 अध्यक्ष संदीप त्रिभुवन यांनी आयोजन केले.या राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव घोडे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शिंदे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here