नशिराबादसह १५ ग्रामपंचायतीचे भवितव्य निवडणूक आयोगच्या हाती !

election-commission

नगर परिषदेत परिवर्तीत होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – सध्या राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असतांना राज्यातील १५ ग्रामपंचायतीची नगरपरिषदेत परिवर्तीत करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांना ग्रामपंचायत निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्यामुळे शासनाच्या नगर विकास विभागाने राज्यनिवडणूक आयोगाकडे ३ महिने निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी नगरविकास विभागाने पत्राद्वारे मागणी केली आहे त्यामुळे या १५ ग्रामपंचायतींचे भवितव्य निवडणूक आयोगाच्या हाती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

State Election Commission

 

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद ग्रामपंचायत नगरपंचायत होण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्तावही सादर केला होता. नशिराबाद ग्रामपंचायतीची नगरपरिषद रुपांतराची प्राथमिक उदघोषणा करणार तोच ग्रा पं निवडणुका घोषित झाल्यामुळे नशिराबाद सह राज्यातील १५ ग्रा पं तिचे रूपांतर नागरपरिषदे मध्ये व हद्दवाढ होणार की नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 

शासनाची आयोगाकडे तीन महिने निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी
शासनाच्या नगर विकास विभागाने याबाबत गंभीर दखल घेवून या १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका ३ महिने पुढे ढकलण्याबाबत एका पत्राद्वारे मागणी केली आहे.त्यात नमूद केले आहे की, माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणार्‍या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र या पैकी राज्यातील १५ ग्रामपंचायती बाबत नगरपंचायत नगरपरिषद रूपांतराची हद्दवाढीचे कार्यवाही नगर विकास विभागामार्फत सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणुका झाल्या तर त्यानंतर विभागाने नागरपरिषद रूपांतराची कार्यवाही केल्यावर या ग्रामपंचायतीचे अस्तित्व संपुष्टात येईल व पुन्हा तेथे नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणाच्या निवडणुका घ्याव्या लागतील सबब निवडणुकांवर शासनाचा दुहेरी खर्च होणार त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीवर नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे सदस्यत्व ही संपुष्टात आल्याने त्यांच्याकडूनही न्यायालयात प्रकरणे दाखल केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबी विचारात घेउन राज्य निवडणूक आयोगाने सदर १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका ३ महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती नगर विकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. या विनंती पत्रावर नगर विकास विभागाचे उपसचिव स. ज. मोघे यांनी पत्रक काढून राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलेले आहे.

दरम्यान, नशिराबाद सह नाशिक जिल्ह्यातील ओझर, सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, माहळूग , वैराग, पुणे जिल्ह्यातील मंचर, माळेगाव आदींसह जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी तर चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या १० ग्रा प चा समावेश असून अमरावती जिल्ह्यातील लेहगाव व शिवार तर पुणे जिल्ह्यातील औताडे , हंडेवाडी, शेवाळे वाडी व वडाची वाडी या ५ ग्रा प चे हद्द वाढ प्रश्‍न प्रलंबित आहे. यामुळे येथील निवडणुकीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here