११ गाव शेतकरी संघटना कुसुंबळे विभागांचा ACRMP अंतर्गत सुरू होणा-या खारलॅन्डाच्या योजनेला मंडळ व पुनर्वसन खात्याच्या कामास आक्षेप

alibaug-nivedan

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – अकरा गाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजा केणी यांच्या पुढाकाराने दिले जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रमुख अटीत संबंधित शेतक-यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व ७/१२ वरील खारलँडचे शिक्के काढून ७/१२ कोरा करावा ही आहे.

 

 

alibaug-nivedan-copy

योजना मंडळ व पुनर्वसन खाते ACRMP अंतर्गत चालू होणा-या काचळी, पिटकिरी, खारभुमी योजना या कामास अकरा गाव शेतकरी संघटना,कुसुंबळे यांनी संघटनेचे अध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी यांच्या पुढाकाराने तिव्र विरोध दर्शवून आक्षेप घेतला आहे. काचळी, पिटकिरी, वाघविरा, चिखली येथील शेतक-यांच्या खाडीतील असणा-या सर्व ७/१२ वर जे खारलँडचे शिक्के बसले आहेत ते काढून ७/१२ कोरा करावा व शासनाच्या नियमाप्रमाणे जो मोबदला आहे तो या शेतक-यांना देण्यात यावा या प्रमुख अटी समोर ठेवून त्यासंदर्भातील निवेदन नुकतेच अकरा गाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजा केणी यांच्या पुढाकाराने उपजिल्हाधिकारी बैनाडे यांना देण्यात आले.

 

सदरील वरील योजनेसंदर्भातील काम सुरु करण्यापूर्वी शेतक-यांना योग्य तो न्याय मिळावा असे यावेळी सांगण्यात आले. खारभुमी योजनेचा सर्व्हे करताना संबधित महसूल व अलिबाग तहसिल अधिका-यांनी काम सुरु करण्यापूर्वी शासनाच्या नियमाप्रमाणे शेतक-यांना मोबदला दिला जाईल व शेतक-यांचे बांध बंधिस्तीला लागुन असणारे कांदळवन (मॉग्रोज) येत असून ती कांदळवन न मोडता हे काम पुर्ण केले जाईल तसेच काम सुरु करण्यापूर्वी काचळी, पिटकिरी, वाघविरा व चिखली येथील शेतक-यांच्या खाडीतील सर्व ७/१२ वर जे खारलँडचे शिक्के बसले आहेत ते शिक्के काढून ७/१२ कोरा करण्यात येईल असे आश्वासन खारलँड चे अधिकारी व अलिबागचे त्यावेळचे तहसीलदार यांनी शेतक-यांना दिले होते मात्र आजपर्यंत त्या आश्वासनांची पुर्तता करण्यात आली नाही असे असताना वरील अटी व आश्वासने पुर्ण करुन जोपर्यंत शेतक-यांचे प्रश्न सूटत नाहीत तोपर्यंत काम सुरु करण्यास शेतक-यांचा तिव्र आक्षेप आहे व जर मनमानी कारभार केला तर शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी आक्रमक पवित्रा घेतील अशी सुचना शेकडो शेतक-यांच्या उपस्थितीत अकरा गाव शेतकरी संघटना कुसुंबळेचे अध्यक्ष राजाभाई केणी यांनी संबधितांना दिली. व त्यासंबधिचे निवेदन नुकतेच सदस्यांच्या उपस्थितीत संघटनेचे अध्यक्ष राजाभाई केणी यांनी उपजिल्हाधिकारी बैनाडे यांना नुकतेच दिले.या वेळी सोबत उप अध्यक्ष मन्मय पाटील सेक्रेटरी अनिकेत पाटील खजिनदार प्रमोद पाटील सदस्य श्रीकांत पाटील महेश वावेकर राजेश पाटीलआदी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here