अबूजा – नायजेरियातील कॅट्सिना स्टेटमधील एका शाळेतून तब्बल 344 अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांना सोडण्यात आले आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने याची घोषणा केली.
नायजेरियन टीव्ही नेटवर्क एनटीए, कॅटसिनाचे गव्हर्नर अमीनू मसारी यांनी गुरुवारी सांगितले की, ‘मला वाटते की, आम्ही बहुतेक मुलांची सुटका केली आहे.’शुक्रवारी या विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी होणार असून त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठविण्यात येईल, असे मसारी यांनी सांगितले.
राष्ट्राध्यक्ष मुहम्मू बुहारी यांनी या विद्यार्थ्यांच्या सुटकेचे स्वागत केले आहेत. तसेच, ‘त्यांच्या कुटुंबासाठी, संपूर्ण देशासाठी आणि आंतरराष्ट्रीय समुदायासाठी मोठा दिलासा दिला आहे,’ असे त्यांनी म्हटले आहे.11 डिसेंबरच्या रात्री राज्यातील कंकारा भागात असलेल्या शासकीय विज्ञान माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अज्ञात बंदूकधार्यांच्या गटाने अपहरण केले. माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यांना शेजारच्या जामफारा राज्यातील एका विशाल जंगलात नेण्यात आले.अपहरणानंतर स्थानिक सरकारने विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांशी बोलणी केली.या बोर्डिंग स्कूलमध्ये 839 विद्यार्थी शिकत आहेत.







