राजगृहावर झालेल्या हल्ल्याचा धरणगाव शिवसेनेतर्फे निषेध

धरणगाव (योगेश पी.पाटील) – भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील “राजगृहावर” झालेल्या शुक्रवारी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्यात यावी, असे निवेदन शिवसेना धरणगावच्या वतीने नायब तहसीलदार मोहोळ यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटिल., लोकनियुक्त नगराध्यक्ष.निलेश सुरेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, शिवसेना गटनेते पप्पु भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, नंदू पाटिल, भानुदास विसावे (राष्ट्रीय चर्मकार कार्याध्यक्ष) तसेच सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here